आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाची 2 नवीन प्रकरणे तर 7 मृत्यू, परिसरात सोशल डिस्टेंसिंग अशक्य







मुंबई. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरात मंगळवारी दोन नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर रुग्णांची एकूण संख्या सात झाली आहे. बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, संक्रमितांचे वय 80 आणि 49 वर्षे आहे आणि ते दोघेही धारावीतील डॉ. बलीगा नगरचे रहिवासी आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही रुग्ण यापूर्वी आढळलेल्या संक्रमित महिलेच्या संपर्कात आले होते. धारावीता यापूर्वी चार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका 56 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती दिल्लीतील तब्लीगी जमातच्या कार्यक्रामातून आलेल्या लोकांच्या संपर्कात आला होता. धारावीतील चार परिसर डॉ. बलीगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर आणि मदीना नगरमध्ये वाढते संक्रमण पाहता, किटकनाशकांची फवारणी केली जात आहे.


लहान-लहान खोलीत राहतात 5-6 लोक


5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या धारावीमध्ये सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे अशक्य आहे. 40 वर्षांपासून या परिसरात राहणाऱ्या राष्ट्र सेवा समितीचे अध्यक्ष रमाकांत गुप्ता सांगतात की, धारावीमध्ये 100 चौरस फुटांच्या लहान-लहान खोल्यांमध्ये 5-6 लोक राहतात. अशात वातावरणात जर एका व्यक्तीलाही संक्रमण झाले, तर इतरांनाही त्याची लागण होण्याची दाट शक्यता आहे.


दुसरी बाब म्हणजे, या भागात बहुतेक लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. त्यामुळे या भागात मनात असूनही सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे अशक्य आहे. दुसरीकडे कुंभारवाडा परिसरातील लोकांनी संक्रमणाचा धोका पाहत, स्वतः नियमांचे पालन करत आहेत आणि त्यांनी आपल्या परिसराला सील केले आहे.


योग्य शिक्षण नसल्यामुळे जास्त परिणाम


तिकडे नवरंग कंपाउंड परिसरात प्लास्टिक आणि कचरा वेचणारे 150-200 गरिब कुटुंब राहतात. या लोकांसाठी सामाजिक संस्थांनी जेवणाची सोय केली आहे. बॉलिवुडसाठी डिजायनर डांसिंग शूज बनवणारे जमील शाह सांगतात की, धारावीमध्ये अनेल लोक अशिक्षित आहेत. यामुळे त्यांना कोरोनाबाबत जास्त माहिती नाही आणि त्यामुळेच संक्रमण वाढण्याची शक्यता जास्त आहे.


रॅपर्स आणि हिप हॉप ग्रुप देत आहेत 'स्टे होम'चा संदेश


धारावी जेव्हा गुन्यांमुळे बदनाम होत होती, तेव्हा याच परिसरातील तरुण रॅपर्स आणि हिप हॉप ग्रुपने परिसराला नवीन ओळख मिळवून दिली. आज येथील डोपोडेलेक्स, सेवन बंताइज, फाइवडॉग्स आणि एनिमीज नावाच्या ग्रुपचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर आहेत. या ग्रुपमधील आर्टिस्ट सध्या आपल्या घरात आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टेंसिंगबद्दल जागरुकता पसरवत आहेत.


भायखलातील चाळीत 10 कोरोनाग्रस्त तर एकाचा मृत्यू


मुंबईमधील भायखळातील एका चाळीत 10 कोरोनाग्रस्त आढळले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. मुंबईजवळील कल्याणमध्येही एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली. यात एक सहा महिन्यांचे बाळ आहे. चिंतेची बाब म्हणजे, यापैकी एकाचीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आणि त्यांच्या कोणत्याच नातेवाईकालाही कोरोणाची लागण झालेली