जाहीर आवाहन

समस्त भावसार क्षत्रिय बांधवांना विनंती आहे की हिंगलाज महोत्सव येथे देवदर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असलेल्या समस्त भावसार बांधवांना कळविण्यात आनंद होतो की ज्या समाज बांधवांकडे लग्नयोग्य वधू - वर असतील त्यांनी या कार्यक्रमामध्ये त्यांना अगत्याने घेऊन यावे. तसेच आपल्या मुला-मुलींचे बायोडाटा असेल तर तेसुद्धा घेऊन यावे. समाजात मुला मुलींची विवाह समस्या निर्माण झाली आहे ,त्यावर काही प्रमाणात उपाययोजना म्हणून *भावसार युवा एकता* आणि *हिंगलाज महोत्सव समितीने* हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.यासाठी स्वतंत्र * विवाह नोंदणी कक्ष* आणि *वधुवर परिचय* अशाप्रकारचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पुढील वर्षी हिंगलाज महोत्सव या कार्यक्रमासह *वधू-वर परिचय व सामूहिक विवाह मेळावा* हा कार्यक्रम आपल्या सहभागातुन घेण्याचा आमचा मानस आहे. तशा प्रकारची मागण समस्त भावसार बांधवांकडून होत असल्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी आम्ही हा वधू-वर परिचय आणि परिचय पत्र संकलित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. तरी कृपया ज्यांच्याकडे वधू- वर आहेत त्यांनी या सामाजिक उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.